ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत झिंगुजी महाराज यांचा ८६ वा पुण्यतिथी महोत्सव

२८ व २९ नोव्हेंबरला विविध कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       स्थानिक श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान समितीच्या वतीने श्री संत झिंगुजी महाराज यांचा ८६ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे दि. २८ व २९ नोव्हेंबरला विविध कार्यक्रमाद्वारे स्थानीय श्रीसंत झिंगुजी महाराज देवस्थान येथे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. २८ नोव्हेंबरला सकाळी ५ वाजता घटस्थापना व श्री ची पूजा आरती, सकाळी ७ वाजता नगर स्वच्छता अभियान, सकाळी ९ वाजता योग्या नेत्रालय व सर्जिकल सेंटरच्या सौजन्याने नेत्र तपासणी व रोग निदान शिबिर,सकाळी १० वाजता लीलावती दातांचा दवाखाना भद्रावतीच्या सौजन्याने दंत चिकित्सा शिबिर, दुपारी १२:३० वाजता साईप्रकश म्युझिकल ग्रुप द्वारा भक्ती गीतांचा कार्यक्रम, दुपारी ३ वाजता हरिपाठ, सायं.४ वाजता भजन संध्या, सायं.७ वाजता ह.भ.प.अक्षयपाल महराज आगर जिल्हा अकोला यांचे जाहीर कीर्तन,रात्री १० वाजता जागृती भजन होईल.याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे, तहसीलदार बालाजी कदम, ठाणेदार योगेश्वर पारधी, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष

 रवींद्र शिंदे, वनपरिक्षेत्राधिकारी किरण धानकुटे,जिल्हा भोई समाज सेवा संघ अध्यक्ष कृष्णाजी नागपुरे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिंदे,श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक विशाल गावंडे या मान्यवरांची उपस्थिती राहील.

शनीवार दि.२९ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता श्री ची पूजा व आरती, सकाळी ८ वाजता भजन, सकाळी ११.३० वाजता ह.भ.प.आशिष महाराज मानुसमारे यांचे गोपाल काल्याचे किर्तन व दहीहंडी, दुपारी १:३० वाजता श्रींच्या पालखीची प्रमुख मार्गाने भजन दिंडीसह भव्य मिरवणूक, सायं.६ वाजता पासून भव्य महाप्रसाद वितरीत करण्यात येणार. या दोन दिवसीय भव्य कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये