ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांकरितांना नाममात्र दरात मसाला भात

शेतकरी संरक्षण समितीचा स्तुत्य उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            शेतकरी संरक्षण समितीच्या वतीने ठोक भाजीपाला बाजारामध्ये मसाला भात वितरण केंद्र संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बदखल यांच्या पुढाकार्याने सुरू करण्यात आले. या वितरण केंद्राचे उद्घाटन नायब तहसीलदार मधुकर काळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा,ॲड.भूपेंद्र रायपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वितरण केंद्राकरिता २२१ धान उत्पादक शेतकरी व १५ तालुक्यातील शेतकरी संरक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांची नियमित मदत लाभणार आहे. सकाळी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शेतकरी संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी दिली.

सदर केंद्र सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहील. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते दिलीप ठेंगे,रामभाऊ आस्वले,भाऊराव कुटेमाटे,किशोर पांढरे, शरद लांबे यासह इतर नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये