ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांधी सिटी पब्लिक स्कूल, पुलगाव येथे सायबर गुन्हे जागरूकता व्याख्यान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पुलगाव : आज दि. 06/11/2025 रोजी गांधी सिटी पब्लिक स्कूल, पुलगाव येथे सायबर गुन्हे या विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वर्धा पोलीस विभागातील सायबर सेलचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे, अंकित जिभे व स्मिता महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डिजिटल माध्यमांचा वाढता वापर पाहता विद्यार्थी ऑनलाईन गेम, सोशल मीडिया व इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाबाबत तसेच फ्री गिफ्ट, टॉप-अप, स्किन्स, अॅडव्हान्स लेव्हल अशा आमिषांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला.
गेम खेळताना अनोळखी व्यक्तींशी चॅट करणे, वैयक्तिक फोटो-व्हिडिओ शेअर करणे, अनोळखी व्हॉईस/व्हिडिओ कॉल स्वीकारणे हे धोकादायक असू शकते याची जाणीव करून देण्यात आली.

सोशल मीडियावर फेक आयडी, फ्रेंड रिक्वेस्ट, स्टेटस किंवा पोस्टद्वारे होणारे ब्लॅकमेलिंग, सायबर बुलिंग व खोटी माहिती यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
इंटरनेटवर अपलोड केलेली कोणतीही माहिती कायम राहते, त्यामुळे आपली वैयक्तिक माहिती, लोकेशन व खासगी क्षणांचे फोटो शेअर करताना काळजी घेण्याची सूचना देण्यात आली.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय सिंगंनजुडे, शिक्षकवृंद तसेच २०० विद्यार्थी उपस्थित होते.मुख्याध्यापकांनी सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचे आभार मानत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल भविष्य घडण्यासाठी मदत होते, असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये