
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
पाथरी पोलिसांनी मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत १२ क्विंटल ६० किलो वजनाच्या 12 एम. एम.चे 126 (बार )लोखंडी सलाखी जप्त केल्या आहेत. सदर मालाची अंदाजे किंमत 37800/रुपये असून, या प्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात करण्यात आली आहे.
दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पाथरी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या आसोलामेंढा प्रकल्पाच्या पाथरी जवळील कॅनॉलवरील टायगर पासचे काम मुसळे कंट्रक्शन नागपूर या कंपनीचे बांधकाम सुरु आहेत त्यांचा साईटवरून सलाखी चोरीला गेल्याची तक्रार 31जाने. रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार पाथरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रामभाऊ वकटुजी ठिकरे (वय 54), अमित रामभाऊ ठिकरे (वय ३०) व जयंत रामभाऊ ठिकरे (वय २८) सर्व रा. पाथरी, ता. सावली, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी सदर घटना स्थळवरून अंदाजे 2 ते 3 किलोमीटर असलेल्या यशवंत ठिकरे रा. पाथरी यांच्या शेतातील तनीसाचा ढीगाऱ्यात लपवून ठेवल्याची माहिती दिली.
आरोपींच्या सांगण्यावरून चोरीस गेलेली १२ क्विंटल ६० किलो लोखंडी सलाखी तसेच गुन्ह्यासाठी वापरलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर-ट्रॉली 500000/असा एकूण 537800/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन कलम 303(2),3(5) बिएनएसअंतर्गत आरोपीवर पाथरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून
ही कारवाई सुदर्शन मुमक्का, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व सत्यजित आमले उपविभागीय पोलीस अधिकारी, मूल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितेश डोर्लीकर, पो. उप. नि. गोविंद चाटे, सुनील गेडेकर, अमीत मस्के, मेघशाम गायकवाड, गिरीधर आंबोरकर, बळीराम बारेकर, दत्ता शिंदे पुढील तपास पाथरी पोलीस करित आहे.


