ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका बार असोसिएशन कोरपना ची कार्यकारिणी जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तालुका बार असोसिएशन कोरपना ची नव्याने नियुक्त कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून, या कार्यकारिणीत अनुभवी व तरुण वकिलांचा समावेश करण्यात आला आहे. कायदेविषयक कार्य अधिक प्रभावी, पारदर्शक व संघटितपणे राबविण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी ॲड. श्रीनिवास मुसळे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी ॲड. दीपांजली मंथनवार, सचिवपदी ॲड. पवार, सहसचिवपदी ॲड. मेघा धामोरीकर आणि कोषाध्यक्षपदी ॲड. जुबेर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ॲड. कृपाल कोल्हे व ॲड. पल्लवी कडुकर यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून वकिलांच्या विविध समस्या, न्यायालयीन सुविधा, बार व बेंच यांच्यात समन्वय तसेच नवोदित वकिलांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या निवडीबद्दल तालुका बार असोसिएशनच्या सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन कार्यकारिणी न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी आणि वकिलांच्या हितासाठी प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये