ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यासेवाधिकारी ॲड. दत्ताजी हजारे यांचा श्री गुरुदेव सेवकांकडून सन्मान व सत्कार 

श्रीगुरुदेवांचे कार्य गावोगावी पोहचावे - एड.दत्ताजी हजारे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ,श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम केंद्रिय प्रचार विभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्वदूर गावोगावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी चंद्रपूर जिल्हासेवाधिकारीपदी तथा जिल्हा मार्गदर्शक ॲड.दत्ताजी हजारे यांची नियुक्ती करण्यात आली म्हणून त्यांचा शाल,राष्ट्रसंत साहित्य,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून राजुरा व गोंडपिपरी तालुक्याच्या सेवकांकडून सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा सेवाधिकारी ॲड.दत्ताजी हजारे यांनी राजुरा व गोंडपिपरी या दोन तालुक्यांचा सेवाधिका-यांना स्वहस्ते नियुक्तीपत्र प्रदान केले . गोंडपिपरी तालुका सेवाधिकारी म्हणून विश्वास सुर यांची तर राजुरा तालुका सेवाधिकारी म्हणून ज्येष्ठ प्रचारक लटारु उद्धवराव मत्ते यांची नियुक्ती केलेली आहे तर राजुरा तालुका प्रचारप्रमुख पांडुरंग शेंडे (मु.देवाडा) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजुरा शहर नगरसेवाधिकारी म्हणून बळीराम पाटील बोबडे, तर संघटक म्हणून मनोहर बोबडे इत्यादी मंडळींना नियुक्तीचे पत्र चंद्रपूर जिल्हासेवाधिकारी ॲड. दत्ताजी हजारे यांनी दिले आणि प्रचारकार्य महाराजांच्या तत्वज्ञानाप्रमाणे अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे करावे असे आवाहनही त्यांनी केले आणि महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात.यावेळी ॲड.रंगारी,ॲड.राजेंद्र जेनेकर,ॲड.अटाळकर,ॲड.आघात आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्याचे मार्गदर्शक ॲड.दत्ताजी हजारे साहेबांची चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारीपदी निवडीबद्दल ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी त्यांचे मनपुर्वक अभिनंदन केले तसेच सर्व प्रचारकांचे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये