ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिलांनी गावाच्या विकासाची जबाबदारी हातात घ्यावी : अल्का आत्राम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

भिमनी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महिलांसाठी विविध स्पर्धा, दुपारी बारा वाजता महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम, तर सायंकाळी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक महोत्सव व आनंद मेळावा आयोजित करण्यात आला.

गावाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून दरवर्षी महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. यामध्ये महिलांसाठी खेळ, नृत्यस्पर्धा, डिश स्पर्धा तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमाचा समावेश असतो. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा घेण्यात येतो. अशा उपक्रमांमुळे “गाव माझा आणि मी गावाचा” ही भावना अधिक बळकट होण्यास मदत होते. दिवसभर गावात उत्सवाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती अल्का आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, महिलांनी संघटित होऊन गावाच्या विकासाची जबाबदारी स्वतःच्या हातात घ्यावी, तरच गावाचा खरा विकास साधता येईल.

कार्यक्रमाला माजी उपसभापती विनोद देशमुख, बाजार समितीचे सभापती रवीभाऊ मारपाल्लीवार, रोशन ठेंगणे, सरपंच पपीता तोडसाम, उपसरपंच रंजीत पिंपळशेडे, अश्विनी मेकरतीवार, ग्रामसेवक भासारकर, मुख्याध्यापक गुडपल्ले, वैशाली बोलमवार, पपीता पोलपोलवार, माया कोहळे, शिल्पा नागूलवार, हंसा मेश्राम, प्रवीण दूधकोहार, संतोष कोडापे, कांता काळे इटकलवार, तडस मॅडम, शेख मॅडम, गुडपल्ले मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये