संतोष चित्रमंदिर जवळील ते अतिक्रमण तात्काळ काढून टाका
प्रशांत डोणगावकरची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संतोष चित्र मंदीर च्या पश्चिम दिशेला डी पी रोडवर 3 नोव्हेंबर रोजी रात्री भाजप चे शहर अध्यक्ष निशिकांत भावसार व इतर यांनी बेकादेशीर टिन शेड चे बांधकाम केले आहे सदर अतिक्रमण तात्काळ काढून टाका अशी मागणी प्रशांत डोणगावकर व इतरांनी पत्रकार परिषदेत केली.
संतोष चित्रमंदिर ते सब ट्रेझरी रोड वरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात स्व भूपाल पन्नालाल डोणगावकर यांनी उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात रिट पीटिशन दाखल केली आहे , दरम्यान नगर परिषद देऊळगाव राजा यांनी संपूर्ण अतिक्रमण काढून सिमेंट रोड तयार करून सार्वजनिक वापरासाठी सुरू करण्यात आला आहे.
3 नोव्हेंबर रोजी रात्री निशिकांत भावसार यांनी सदर रोड वर टिन शेडचे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे, मंत्रालयातील उच्च पदावर कार्यरत अधिकारी व स्थानिक राजकीय नेते यांचा पाठिंबा असल्याचा संशय डोणगावकर यांनी व्यक्त केला आहे.
4 नोव्हेंबर रोजी श्रीमती अर्चना भूपाल डोणगावकर व प्रशांत पन्नालाल डोणगावकर यांनी नगर परिषद येथे सदर अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी केली आहे
सदर अतिक्रमण मुळे रोड अरूंद होऊन दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, आठवडी बाजारात जाणारा रस्ता असल्याने नागरिकांना अडथळा होणार आहे, अतिक्रमण मुळे बालाजी महाराज यांचे भक्तगणमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, सदर अतिक्रमण ला राजकीय अभय प्राप्त झाल्यास भविष्यात शहरातील इतर रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता आहे, तेव्हा प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता तातडीने कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.
पत्रकार परिषदेत श्रीमती अर्चना डोणगावकर, प्रशांत डोणगावकर, सुमित डोणगावकर, सुबोध मिश्रीकोटकर , कविशभाऊ जिंतूरकर व इतर उपस्थित होते.



