ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य राखीव पोलीस दलाच्या मालवाहू गाडीची मोटरसायकलला धडक

एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी ; नागभीड ब्रह्मपुरी रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन बस स्थानकाजवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

हिंगोली वरून नागपूर मार्गे गडचिरोली जाणाऱ्या राज्य राखीव पोलीस दल बल क्रं.(१२) च्या मालवाहू चारचाकी वाहनाने अचानक दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात ब्रह्मपुरी नागभीड राज्य महामार्गावर सीआरपीएफ च्या वाहनाने दुचाकी वाहनाला धडक दिल्याने गुरुवार दि‌ ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अपघात घडला. त्यात माहेर गावातील मोटार सायकल चालक आशिष राजेश्वर बागडे वय (३२) वर्ष या मोटार सायकल चालकाला ब्रह्मपुरी येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला विजय किसन नागापुरे वय (४०) वर्ष राहणार माहेर हा युवक गंभीरित्या गंभीरित्या जखमी झाला असून त्याच्यावर ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार हिंगोली वरून राज्य राखीव पोलीस दल बल क्रमांक १२ यांचे मालवाहू ट्रक गडचिरोलीच्या दिशेने येत होती. अचानक ब्रह्मपुरी नागभिड रोडवरील ब्रह्मपुरी शासकीय तंत्रनिकेतन बसस्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्गावरून एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात राज्य राखीव पोलीस दलाच्या मालवाहू चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराच्या मोटारसायकला धडक दिल्याने मोठा अपघात झाला. त्यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. वेळीच त्यांना उपचारार्थ ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच आशिष बागडे वय (३२) वर्ष यांचा मृत्यू झाला असून विजय नागपुरे वय (४०) वर्षे हा गंभीरित्या जखमी आहे. सध्या त्याच्यावर गडचिरोली येथील शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

ट्रक चालक ज्ञानेश्वर ढाले असे सीआरपीएफ जवान चालकाचे नाव असून त्याच्यावर ब्रह्मपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये