ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
हेटी येथून चोरट्यांनी केली बैल जोडी लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना – तालुक्यातील हेटी येथील एका शेतकऱ्याची बैल जोडी लंपास केल्याची घटना गुरुवार दिनांक ५ रोजी सकाळी उजेडात आली.
ही बैल जोडी संभाजी जगनाडे यांच्या मालकीची आहे. त्यांचा हेटी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे गुरांचा गोठा आहे.तिथून ही बैल जोडी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यातच शेतीची कामे कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कोरपना तालुक्यात जनावरे चोरीच्या घटनेत मागील काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


