ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वेतून अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्या महिला जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 06/02/2026 रोजी पो. हवा./240 गणेश वाघाडे, पो.शि./16 पंकज भांगे, पो.शि./131 अश्विन पनेलवार, म.पो.शि./1203 किर्ती मिश्रा व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. शि./571 अखिलेश चौधरी, पो. शि. 612 निलेश निकोडे यांना गुप्तबातमीदारामार्फतीने खात्रीदायक माहिती मिळाली की, ट्रेन नं. 12772 रायपूर-सिकंदराबाद एक्सप्रेस चे पुढील जनरल कोचमधुन दोन महिला 1) कथ्थ्या रंगाची साडी व त्यावर फुले असलेली 2) हिरव्या रंगाची फुले असलेली साडी घातलेली अशा दोन महिला बॅग व चैल्यांमध्ये दारूची अवैधरित्या वाहतुक करीत आहेत व सदर महिला ह्या रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथे उतरून जावू शकतात.

अशा मिळालेल्या खात्रीदायक माहितीवरून त्यांनी दि. 06/02/2026 रोजीचे 00.05 वा. सदरची ट्रेन ही रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथे अटेंन्द्र करणेकामी रवाना होवून सदर ट्रेन ही रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथे पोहचली असता नमुद स्टॉफ सदर ट्रेन चे पुढील जनरल कोचमध्ये चडुन नमुद वर्णनाच्या महिलांचा शोध घेत असतांना नमुद ट्रेन ही रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथुन सुटली. त्यानंतर चालु ट्रेन मध्ये नमुद दोन महिला ह्या 2 बंगा व 2 चैल्यांसह नमुद स्टॉफ ला मिळून आल्या. त्यांचेकडील बॅगा व थैल्यांबाबत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने सदर बेंगा व गेल्या चेक केले असता त्यात विना पास-परवाना Officer’s Choice SUPRIME WHISKY कंपनीची विदेशी दारू मिळून आली. त्यामुळे नमुद ट्रेन ही रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथे PF No. 1 वर पोहचल्यावर नमुद महिलांना दारूसह रे.स्टे. बल्हारशाह येथील PF No. 1 वर काजीपेठ एन्डकडे नमूद ट्रेनमधून उतरवून त्यांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी 1) राजकुमारी w/० धिरेंद्र जाट वय 38 वर्षे, रा. पत्ता बेलबाग रोड, नियर बेलबाग रोड हायस्कुल, महाऋषी अरविंद वार्ड, धामापूर, जबलपूर जि. जबलपूर (म.प्र.) असे सांगितले असुन तिचे ताब्यात एक काळ्या रंगाची Skybags लिहिलेली सँग बैंग त्यात Officer’s Choice SUPRIME WHISKY 180ml प्रती कि, 170/- रू. FOR SALE IN MADHYA PRADESH ONLY असे कागदी लेबल असलेल्या विदेशी दारूच्या 41 प्लॅस्टिक बॉटल्स किं. 6.970 रू. व एक हिव्या रंगाची दिलबाग असे लिहिले असलेली थैली त्यात Officer’s Choice SUPRIME WHISKY 180ml प्रती किं. 170/-, FOR SALE IN MADHYA PRADESH ONLY असे कागदी लेबल असलेल्या विदेशी दारूच्या 62 प्लॅस्टिक बॉटल्या किं, 10,540/- रू. 2) राणीबाई w/o गब्बर जाट वय 48 वर्षे, रा. H.No. 210/1, बेलबाग रोड, नियर बेलबाग रोड हायस्कुल, महारूपी अरविंद वार्ड, धामापूर, जबलपूर जि. जबलपूर (म.प्र.) असे सांगितले असुन तिचे ताब्यात एक रंगीबेरंगी फुले असलेली हिरव्या रंगाची लेडिज हॅन्डबॅग त्यात Officer’s Choice SUPRIME WHISKY 180ml प्रती किं, 170/- रू. FOR SALE IN MADHYA PRADESH ONLY असे कागदी लेबल असलेल्या विदेशी दारूच्या 55 प्लॅस्टिक बॉटल्स कि 9,350/- रू. व एक लाल रंगाची घडी असे लिहिले असलेली थैली त्यात Officer’s Choice SUPRIME WHISKY 180ml प्रत्ती किं. 170/-. FOR SALE IN MADHYA PRADESH ONLY असे कागदी लेबल असलेल्या विदेशी दारूच्या 29 प्लॅस्टिक बॉटल्स किं. 4,930/- रू. असा एकूण 31,790/- रू. चा माल मिळून आल्याने पो. हवा. / 240 गणेश वाघाडे यांनी दोन पंचासमक्ष जप्त केला. दोन्ही महिला आरोपी यांनी संगनमत करून आपले ताब्यात विना पास परवाना नमुद विदेशी दारू बाळगुन अवैध रित्या वाहतुक कामी घेवुन जातांना रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथे मिळून आलेबाबत सरकार तर्फ पी.हवा./240 गणेश वाचाडे यांनी दिलेल्या रिपोर्टवरून रे. पो. चौकी बल्हारशाह येथे मोमेंट डायरी अंमलदार पो.शि./449 राजेश ठाकरे यांनी मु, ऑ. नं. 04/2026 कलम 65 (अ), 66 (1) (ब) महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा ऑकन्स दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही श्री. मंगेश शिंदे पोलीस अधीक्षक सो. लोहमार्ग नागपूर, डॉ. दत्ताराम राठोड अपर पोलिस अधीक्षक सो, श्री पांडुरंग सोनवणे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात सपोनि पंकज ढोके, प्रभारी अधिकारी रे पो स्टे वर्धा, पो. हवा. 240 गणेश वाघाडे, पो. सि./16 पंकज भांगे, पो.शि. /131 अश्विन पनेलवार, पो.शि./449 राजेश ठाकरे, म.पो. शि./1203 किर्ती मिश्रा व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.शि./571 अखिलेश चौधरी, पो.सि./612 निलेश निकोडे यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये