देऊळगाव महीत मध्यरात्री धाडसी चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
एकिकडे सोन्याचे भाव गगनाला भिडत असतानाचं चोरट्यानी दि. 4 फेब्रुवारीच्या 1:30 वाजताच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत घराचा दरवाजा तोडून माजी सैनिकांच्या घरी साडेपाच तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे. या चोरीच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेच्या प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील देऊळगाव मही येथील वार्ड क्रमांक 6 मधील रहवाशी माजी सैनिक रघुनाथ माधव मुजमुले वय.49 यांच्या हॉलच्या दरवाज्याला बाहेरून दोरीने बांधून बेडरूम मध्ये प्रवेश केला. त्याठिकाणी असलेल्या कपाटाचे लॉक तोडून साडे पाच तोळे सोन्याचे दाग- दागिने अंदाजे 2 लाख 75 हजार किंमतीचे दागिने घेऊन चोरटे घराच्या पाठीमागुन पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर बुलढाणा येथील डॉग पथक व फॉरेन्सिक ठसे तज्ञाला पाचरण करण्यात आले होते. या घटनेचा पुढील तपास देऊळगाव राजा ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस चौकीचे इन्चार्ज कलीम देशमुख, पो. हे.कॉ.शरद साळवे हे करित आहे.



