ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिक्लशाचे खडकपूर्णा धरणाचे विसर्जन

शेकडो अनुयायांनी अस्थी क्लशचे घेतले दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थिकलश अमरावती विभागातील संपूर्ण जिल्ह्यात दर्शनासाठी देण्यात आले होते. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात देखील तेराही तालुक्यात अस्थी क्लशचे दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 : 00 वाजता देऊळगाव राजा बस स्थानक चौकामध्ये सदर पवित्र अस्थी कलश ठेवण्यात आले होते.स्व. अजितदादा पवार यांच्या चाहत्यावर्गाणी ग्रामीण भागातून तसेच तालुक्यातून आलेल्या शेकडो अनुयायांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले. शोकसभेनंतर संत चोखासागर (खडकपूर्णा ) प्रकल्पात पवित्र अस्थी कलशाचे मंत्र उपचार तसेच सर्व विधिवत पूजन करून अस्थीक्लाशाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,माजी आमदार दिलीपकुमार सांनदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी,नरेश शेळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नंदाताई कायंदे,भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ. गणेश मांटे, बालाजी संस्थानचे विश्वस्त विजयसिंह राजे जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड,माजी सभापती रियाजखान पठाण,राष्ट्रवादी नेते डॉ. रामप्रसाद शेळके, रिपाई जिल्हाध्यक्ष भाई दिलीपकुमार खरात,युवा नेते सतिश कायंदे, देऊळगाव राजा नगराध्यक्षा माधुरीताई शिपणे,सिंदखेड राजा युवा नगराध्यक्ष वैभव तायडे, गटनेते प्रदीप वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे,प्रा. दिलीपकुमार झोटे, ज्येष्ठ नेते प्रकाश गीते,धनश्रीराम शिपणे, प्रा.सदाशिव मुंढे, राजेश इंगळे, दीपक बोरकर,गजानन पवार, नितीन शिंगणे, गणेश सवडे, उद्धव नाना म्हस्के, महेश देशमुख, सिद्धार्थ जाधव, सुनिल शेजूळकर, उमेश खरात, गोपाळ देव्हडे, दादाराव खार्डे, यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते विविध पक्षाचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय, शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये