घराणेशाहीला लगाम लावून तरूणांना संधी दयावी! _ रविंद्र श्रीनिवासराव शिंदे

चांदा ब्लास्ट
सहकार क्षेत्रात तरूणांचा सहभाग वाढवायचा असेल तर सहकार क्षेत्रातील कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढणे आवश्यक आहे. सहकारात शिक्षेची कार्यवाही कडक असावी आणि कायद्यातील पळवाटा कायमच्या बंद झाल्या पाहिजे. नवीन सहकार धोरणात कर्ज माफीचे मुद्दे ठोस असले पाहिजे. मी पुस्तक वाचुन नाही तर सहकार क्षेत्रातील अनुभवाने बोलतो. सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी घराणेशाहीला लगाम लावुन तरूणांना संधी दयावी असे प्रतिपादन चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी नवीन सहकार धोरण चर्चा सत्रात केले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या बदलत्या सहकार धोरणाच्या पार्श्वभुमीवर सहकार भारती चंद्रपुर, चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या प्रमुख कार्यालयातील मा.सा. कन्नमवार सभागृहात नवीन सहकार धोरण चर्चा सत्र दि.०५.०२.२०२६ रोजी आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष मा. रविंद्र श्रीनिवासराव शिंदे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय रिजर्व्ह बँक व नाबार्ड चे संचालक मा. सतिशजी मराठे यांच्या हस्ते झाले. त्यांनी सहकार क्षेत्र प्रगतीकडे नेण्याच्या दृष्टीकोनातुन सविस्तर मार्गदर्शन केले.
महामंत्री सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्य मा.विवेकजी जुगादे यांनी सहकार धोरणाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला बँकेचे संचालक मा. रोहीत बोम्मावार, संचालक मा. यशवंतराव दिघोरे, सहकार भारती नागपुर विभाग सह प्रमुख विजयजी गोटे. जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था, चंद्रपुरचे मा.एस.एस. बन्सोड, चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. राजेश्वर भि. कल्याणकर, चंद्रपुर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गणेश काळे सहकार भारती चंद्रपुरचे अध्यक्ष मा. सतीश वासमवार, महामंत्री सौ. पुष्पा गोटे शेवटी सहकार धोरण व कायद्यातील बदल यासंबंधाने प्रश्न उत्तरावर चर्चा करण्यात आली.



