चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग–१ येथे सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ जिल्हा कारागृह वर्ग–१ येथे चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या स्थानिक निधीतून मंजूर करण्यात आलेल्या (Decentralised Prefabricated Packaged Jail Liquid Waste Management System) सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाचे लोकार्पण जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग–१ येथे बंद्यांच्या दैनंदिन वापरातून निर्माण होणाऱ्या अंदाजे १ लक्ष लिटर सांडपाण्याची साठवणूक होत होती. दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी कारागृहात आयोजित अभिविक्षक मंडळाच्या बैठकीत कारागृहातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प राबविण्याबाबत जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देश दिले होते.
सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग–१ येथे प्रतिदिन निर्माण होणारे सुमारे १ लक्ष लिटर सांडपाणी शुद्ध करण्यात येणार असून, शुद्ध पाण्याचा कारागृह परिसरातील झाडे व हरित क्षेत्राच्या सिंचनासाठी पुनर्वापर करण्यात येणार आहे. यामुळे नवीन पाण्यावरील अवलंबित्व कमी होणार आहे. सांडपाणी थेट बाहेर सोडले जाणार नसल्याने भूजल प्रदूषणास प्रतिबंध, तसेच परिसरातील दुर्गंधी, डास व रोगराई कमी होण्यास मदत होणार असून, कारागृहातील बंदी व कर्मचारी यांच्यासाठी स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती होणार आहे.
सदर प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे रुपये १.०५ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येऊन मे. लाइफफर्स्ट कॉन्सेप्ट्स अॅण्ड टेक्नॉलॉजीज प्रा. लि., पुणे यांना काम मंजूर करण्यात आले. या STP प्रकल्पाची क्षमता १०० CMD (१ लक्ष लिटर प्रतिदिन) इतकी आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, आयुक्त श्री. अकुनुरी नरेश, भा.प्र.से., शहर अभियंता श्री. रविंद्र हजारे, सहाय्यक अभियंता श्री. सोनू प्रकाशराव थुल, कारागृह अधिक्षक श्री. अनुपकुमार कुमरे, श्री. सतीश सोनवणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, तसेच कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी तुरुंगाधिकारी श्री. प्रकाश लोमटे, लिपिक श्री. विजय माल्टे, श्री. रुपेश रोकडे, श्री. समील गणविर, सुभेदार श्री. शिवशंकर खंडारे, हवालदार श्री. नरेंद्र दशमवार, कारागृह शिपाई श्री. स्वप्नील भोयर, श्री. विरेंद्र श्रीरामे, श्री. विजय कुहिरे, तसेच महिला कर्मचारी श्रीमती मिना मडावी, कु. पुष्पा मुसमाडे, श्रीमती प्रिया तंलाडे, कु. प्राची तेलंग, कु. चंदा नेवारे यांनी मोलाचे सहकार्य केले.



