ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील पाणीटंचाईवर तोडगा

लॉईड मेटल घुग्घुसतर्फे पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील विहीर व पंपासाठी ११.५२ लाखांचा निधी

चांदा ब्लास्ट

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे रुग्णांना मिळणार दिलासा

चंद्रपूर :_ राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यात आला आहे. लॉईड मेटल घुग्घुसच्या माध्यमातून विहीर बांधकाम आणि पंप बसविण्यासाठी ११ लाख ५२ हजार ३८८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे रुग्णालयातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच दैनंदिन वापरासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असते. मात्र पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात पाण्याच्या अपुऱ्या सुविधांमुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रुग्णालयातील दैनंदिन कामकाजावरही याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.

ही बाब लक्षात येताच आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लॉईड मेटल घुग्घुसतर्फे आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रुग्णालय परिसरात नव्याने विहीर बांधण्यात येणार आहे, त्यावर पंप बसवून पाणीपुरवठ्याची सक्षम व्यवस्था उभारली जाणार आहे.

या कामामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक पाणी उपलब्ध होणार असून, त्यांच्या नातेवाईकांसह वैद्यकीय व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे गरजेचे असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले. ग्रामीण भागातील रुग्णालये सुसज्ज व्हावीत आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या निर्णयामुळे पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून, स्थानिक नागरिक आणि रुग्णांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये