ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वनकर्मचारी वर होणाऱ्या हल्ल्याचा संघटनेने केला निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय बुलढाणा समोर वनरक्षक- वनपाल कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून महाराष्ट्र मध्ये ठिक ठिकाणी मानव वन्यजीव संघर्षामुळे वनकर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्यांचा जाहीर निषेध बुलढाणा वनविभागातील वनकर्मचारी यांनी केला आहे.
काळ्या फिती लावून निषेध करण्यामागचा उद्देश असा आहे की.,भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये या साठी महाराष्ट्र शासनाने ठोस उपाययोजना करावी. जेणेकरून मानव वन्यजीव संघर्षामुळे वनकर्मचाऱ्यांवर हल्ला कोणी करणार नाही.
महाराष्ट्र वनरक्षक- वनपाल संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे तसेच संघटना पदाधिकारी व वनरक्षक वनपाल कर्मचारी उपस्थित होते.



