प्रभाग क्रमांक एक साठी श्रीकांत मोहारे यांच्या नावाची जोरदार चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात निवडणूक वारे जोरात फिरू लागले आहे. अशातच जिह्यातील प्रतिष्ठेची गडचांदुर नगर परिषद ची निवडणूक होऊ घातली आहे.येतील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मोहारे यांच्या नावाची प्रभाग क्रमांक एक साठी जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
श्रीकांत मोहारे यांच्या राजकीय कार्य अनेकांना प्रेरणा देत सुरू असल्याचे युवा म्हणत आहे.त्यांच्या सामाजिक राजकीय कार्यासोबतच त्यांना पत्रकारितेचा दांडगा अनुभव सुधा आहे.त्यांनी अनेक समस्या शासन दरबारी मांडलेल्या आहे.गोरगरिब जनतेच्या नगर परिषद असो वा तहसील निराधार समस्या या आवर्जून प्रशासन तसेच समजसोमर मांडल्याने सध्या त्यांच्या पाठीशी प्रभाग एक मधील नागरिकात चर्चेचा विषय बनला आहे.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून प्रभाग क्रमांक एक साठी श्रीकांत मोहारे यांच्या नावाची चर्चा समाजमाध्यमासोबतच नागरिकात ऐकायला मिळत आहे.



