महाविस्तार ॲप डाऊनलोड करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – ललित राऊत
विश्वशांती विद्यालयात "महाविस्तार ॲप"वर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाविस्तार ॲप हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल सल्लागार ॲप आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज,पीक व्यवस्थापन,खतांचा योग्य वापर,बाजारभावांची माहिती आणि आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन मिळते. ज्यामुळे त्याची शेती अधिक फायदेशीर आणि आधुनिक होते,त्यासाठी महाविस्तार ॲप डाऊनलोड करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना शासकीय योजनांची माहिती देऊन प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता प्रवृत्त करावे असे आपल्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी ललित राऊत बोलत होते
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष अनिलभाऊ स्वामी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन जाधव उपकृषी अधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,सहाय्यक कृषी अधिकारी योगेश टेकाळे,आदर्श शेतकरी मुक्तेश्वर भोपये,पर्यवेक्षक राजेश झोडे,सहाय्यक शिक्षक संजय ढवस आणि रुपेश पीठ्ठलवार उपस्थित होते.
याप्रसंगी उपकृषी अधिकारी सचिन जाधव यांचे मार्गदर्शनात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी महाविस्तार ॲप डाऊनलोड करण्यात आले आणि अँप बद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
आयोजित कार्यक्रमाचे संचालन उच्च माध्यमिक शिक्षक राजू केदार यांनी केले तर आभार धनंजय गुरनुले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी मोलाचे सहकार्य केले.
					
					
					
					
					


