अवैधरित्या दारूची तस्करी करणारे व इतर साथीदारांवर देवळी पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा असताना सुद्धा शेजारचे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची तस्करी करून वर्धा जिल्ह्यात त्याची विक्री होत आहे. राकेश वागन्ना रा. भिडी हा त्याचे साथीदारासह कळंब जिल्हा यवतमाळ येथून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी करून त्याची वर्धा जिल्हा परिसरात विक्री करीत असल्याची विश्वासनिय माहिती देवळी पोलिसांना मिळाली.
देवळी पोलिसांनी तात्काळ देवळी शहरालगतचे रिंग रोडची बाजूला असलेल्या माऊली पार्क जवळ नाकेबंदी करीत दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली असता राकेश वागन्ना याचा साथीदार हिरा निळकंठ कोहचाडे रा. कळम जी. यवतमाळ हा राकेश वागन्ना याचे सांगण्यावरून देवळी येथील किरकोळ दारू विक्रेत्याना दारूचा पुरवठा करण्या करिता त्याचे ताब्यातील मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH 35 P 4532 मध्ये अवैधरीचा विना पास परवाना देशी दारूची वाहतूक करतांना रंगेहाथ मिळून आला.
देवळी पोलिसांनी आरोपी हीरा कोहचडे याचे ताब्यातून 1) पाच खरड्याचे खोक्यात व दोन कापडी पिशवीतील 180 मिली च्या 288 निपा असा 57600 रु. किमतीचा दारू माल 2) पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार किंमत 6,00,000 रुपये 3) एक अँड्रॉइड मोबाईल किंमत 15,000 रुपये असा एकूण 6,72,600 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दारूचे तस्करी करिता मदत करणारा चिंतामणी ट्रेडर्स कळमचा चालक नरेश चांदोरे, राकेश वाघांना व हिरा कोहचडे यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन देवळी येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद केलेला असून पुढील तपास पोलीस हवालदार राजेश तिवस्कर करीत आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री अमोल मंडाळकर, पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, पोलीस हवालदार मनीष कांबळे, राजेश तिवस्कर, दुर्गेश बांनते, रंजन पाटील पोलीस स्टेशन देवळी यांनी केली आहे.
					
					
					
					
					


