ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
		
	
	
महात्मा गांधी विद्यालय येथे इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. सोबतच राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते.
सर्वप्रथम इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
श्वेतलाना टिपले यांनी इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जिवन चरित्र वर प्रकाश टाकला. याप्रसंगी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते संचालन व आभार प्रदर्शन श्वेतलाना टिपले यांनी केले.
 
					 
					 
					 
					 
					


