देऊळगाव राजा येथे एकता दौड रॅली ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलिस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी,नागरिक एकता दौड रॅली मध्ये सहभागी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने बुलढाणा पोलिस दल, व पोलिस स्टेशन देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी हायस्कूल येथून सकाळी आठ वाजता भव्य एकता दौड रॅली काढण्यात आली, बस स्थानक, संतोष टॉकीज चौक, गीतांजली टॉकीज चौक अमर जवान चौक व परत शिवाजी हायस्कुल पावेतो रॅली काढण्यात आली.
रॅली मध्ये विध्यार्थी, शिक्षक,उप विभागीय पोलिस अधिकारी, मनिषा कदम, पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी, आमदार मनोज कायंदे यांचे बंधू सतीश कायंदे,इतर कर्मचारी, गावातील जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, पत्रकार सहभागी झाले होते,
भारत माता की जय, वंदे मातरम्, च्या घोषणांनी शहर दुमदमले, शिवाजी हायस्कुल येथे रॅली चा समारोप करण्यात आला, याप्रसंगी उप विभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम यांनी राष्ट्रीय एकता अखंडता टिकुन राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे, युवा पिढीने व्यसन पासून अलिप्त राहावे असे आवाहन केले. याप्रसंगी सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली, राष्ट्रगीताने कार्यक्रम ची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, सतीश कायंदे,पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे, धनसिंग शिपने, प्रकाश खांडेभराड , प्रा विनायक कुळकर्णी यांच्यासह विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी, गावातील जेष्ठ नागरिक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना चे पदाधिकारी , कार्यकर्ते माजी सैनिक,पत्रकार उपस्थित होते.
 
					 
					 
					 
					 
					


