सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश खांडेभराड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सहकारमहर्षी स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा चे अध्यक्ष तथा देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे माजी अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशीनाथ ऊर्फ प्रकाश खांडेभराड यांची बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी केली आहे.
त्यांच्या नियुक्ती चे स्वागत व अभिनंदन आमदार मनोज कायंदे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नाझेर काझी,सतीश कायंदे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, तालुका अध्यक्ष प्रा सदाशिव मुंढे, शहर अध्यक्ष सुनील शेजुळकर, कार्याध्यक्ष प्रदीप वाघ, देऊळगाव राजा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना तसेच जनसेवा सामाजिक संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी, सचिव गोविंदराव बोरकर, गोविंदराव अहिरे प्रा अशोक डोईफोडे, रमेश नरोडे, प्रकाश अहिरे, पंडितराव पाथरकर, मधुकर शेळके, दिनकर जाधव, अरुण सपाटे, मधुकर धुळे, चौधरी, जमदाडे, जगताप, पराड आदींनी केले आहे.



