गोपालपूर येथे ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणिकगढ सिमेंट वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या ईआर नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सी एस आर उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ सिमेंट वर्क्स यांच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमांतर्गत गोपालपूर येथे ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास एकूण ५६ ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्राम सरपंच किशोर वेडमे यांनी भूषविले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या पुष्पा आत्राम, गावपाटील नागेश मडावी, आशा वर्कर पौर्णिमा जाधव, अंगणवाडी सेविका चंद्रकला झुरमुरे, तसेच माणिकगढ सिमेंट वर्क्सचे महबूब बाशा, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर रेनुका मॅडम, व ग्रामातील शिक्षकवर्ग उपस्थित होता.
या वेळी सरपंच किशोर वेडमे व बाशा जी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवांतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. आशा वर्कर पौर्णिमा जाधव यांनी वृद्ध नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना नियमित आरोग्य तपासणी व पौष्टिक आहाराचे महत्त्व स्पष्ट केले.
ग्रामातील ज्येष्ठ नागरिकांनीही आपले जीवनानुभव शेअर करत युवकांना प्रेरणादायी संदेश दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माणिकगढ सिमेंट वर्क्सच्या कर्मचारी सोनाली ठाकरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अंगणवाडी सेविका चंद्रकला झुरमुरे यांनी केले.
ग्रामस्थांनी अशा सामाजिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी मागणी करत अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या सी एस आर टीमचे मनःपूर्वक आभार मानले.



