डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी एस.आय.टी.मार्फत चौकशी करण्यात यावी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संपूर्ण राज्यात सर्वत्र फलटण शहरातील डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण गाजत असल्याने राजकारणी , आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांच्या कडे सध्या सकल समाजाच्या वतीने आरोपीच्या नजरेने पाहिल्या जात असून जो कोणी दोषी असेल त्यांना शोधून आणी आत्महत्येस परावृत्त करणाऱ्या विरोधात सबळ पुरावे मिळविण्यासाठी निःपक्षपाती काम करणाऱ्या अधिकारी यांची एस आय टी टीम तयार करून तपास जलदगतीने करावा अशा प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार मार्फत आज देण्यात आले आहे .
संतांची भूमी असलेल्या आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करू पाहणाऱ्या महायुतीच्या कार्यकाळात एका महिला वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडे या शेतकरी,कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या जिद्दीने आपल्या आई वडिलांचे नाव पटलावर घेऊन जाणाऱ्या मेडिकल ऑफिसर यांना आत्महत्या का करावीशी वाटते ? राजकिय , दबाव , वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी , आनि पोलीस अधिकारी हे खरंच मुंडे यांच्या आत्महत्येचे सूत्रधार आहेत काय ? आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत काय लिहून ठेवले होते की पुरावा नष्ट करण्यामागे कोण ? आईवडील नातेवाईक यांना येई पर्यंत वेळ का घेतला नाही? एवढी घाई कशासाठी ?
खरचं या मागे सत्तेतील राजकिय हस्ती अडकणार तर नसेल ? किंवा सत्ताधारी यांचा या मागे उद्देश काय?
वरिष्ठ आरोग्य अधिकारी , पोलीस अधिकारी या प्रकरणात आरोपी किंवा सह आरोपी तर नाही ना या शंकेस वाव मिळत असल्याने मृतक डॉ संपदा मुंडे ईच्या आई वडील आणी आप्तेष्ट, आणी सकल समाज यांना न्याय हक्का साठी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडवणीस यांनी एस आय टी स्थापन करून डॉ मुंडे आत्महत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करून संपदा च्या परिवारास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे, निवेदनावर सुरेश वणवे , डॉ सुनील कायंदे सतिष कायंदे , मंगेश तिडके ,गजानन वाघमारे, विठ्ठल माने ,संतोष शिंदे , मनोज खांडेभराड , तेजस मुंडे , अर्जुन आंधळे, सचिन आंधळे , डॉ पवन डोईफोडे , इलग , गैबीनंद घुगे सुदाम भाऊ काकड , प्रभाकर मांटे, व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून सकल समाज यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार डॉ संतोष मुंडे यांना निवेदन देण्यात आले.



