ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री खाटू श्याम बाबा मंदिराच्या बांधकामासाठी दीपा ललित कासट यांची भूमि सेवा

10 हजार फुट जागा दान, 1 नोव्हेंबरला होणार मंदिर उभारणीचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट

   जय श्री श्याम सेवा समीतीच्या वतीने श्री खाटू धाम मंदिर उभारण्यात येणार असून सदर मंदिरासाठी दिपा ललीत कासट यांनी खुटाळा गावातील आपल्या मालकीची 10 हजार फुट जागा दान केली असून 1 नोव्हेंबरला सदर मंदिर उभारणीचा शुभारंभ करण्यात येणार असून आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर कामाचे विधिवत भुमिपूजन करण्यात येणार आहे.

   या पवित्र धार्मिक मंदिराच्या भूमिपूजनाचा शुभ सोहळा १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता संपन्न होणार आहे. यशश्री सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. दीपा ललित कासट यांनी आपली स्वतःची जमीन या धार्मिक कार्यासाठी दान दिली आहे. त्यांच्या या उदात्त भूमिदानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील श्रद्धाळूंसाठी एक नवे अध्यात्मिक केंद्र निर्माण होणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन जय श्री श्याम सेवा समिती, चंद्रपूर तर्फे करण्यात आले असून, समितीचे अध्यक्ष ललित कासट, सचिव कुंजबिहारी परमार आणि उपाध्यक्ष रोडमल गलहोत व ईतर श्याम भक्तांच्या पूढाकारातून सदर निमार्ण कार्याला सुरवात होणार आहे.

     सुमारे दहा हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळात उभारले जाणारे हे मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक ठरणार आहे. मंदिर परिसरात दर्शन रांग, प्रसाद वितरण, मंडप व आध्यात्मिक कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात येणार आहे. भक्तीभावाने ओथंबलेल्या या भूमिपूजन सोहळ्याला जिल्ह्यातील अनेक श्यामभक्त, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये