वाहन चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त मनोरंजन सिंह यांची घेतली भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वाहे गुरु ट्रांस्पोर्ट कंपनीचे अपघातग्रस्त ड्राइवर मनोरंजन सिंह यांची अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने भेट घेऊन अपघाताच्या संदर्भात वाहन चालक संघटना त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा देण्यात आला.
चंद्रपुर वाहे गुरु ट्रांस्पोर्ट कंपनीचे ड्राइवर मनोरंजन सिंह आपल्या गाडीत काही सामान चढवित असताना त्यांना अज्ञात मोटारसायकलवाल्यानी धडक दिल्याने त्या अपघातात त्यांचा मांडीचे हाड तुडले. सध्या ते बेकार अवस्थेत गडचांदूर येथे किरायाच्या घरात वास्तव्याला आहेत.
अपघातग्रस्त मनोरंजन सिंह यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ उपरे, संघटनेचे महाराष्ट्र सल्लागार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे,संतोष वाघमारे, शेख अयुब, अहमद खान गौस खान पठाण, भगवान चित्ते, शेख तोहीद, शेख अन्सार, शेख रहीम, सीताराम तलवारे, शेख हर्षद, शेख अजिज, शेख सिराज, तेजेंद्रसिंह, सुनील नरवाडे, संजय पटले, संतोष अवडवार, गुणाजी पुरेवाड, इरफान हाश्मी इत्यादींनी भेट घेऊन सहकार्य करण्याचे ठरविले.



