विविध मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे एस. डी.ओ.कार्यालय समोर विशाल धरणे व तीव्र निदर्शने
मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- राज्यातील सरकार शेतकरी,शेतमजूर,जबरानजोत,झोपडपट्टीधार,संजयगंधी निराधार यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.त्याचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत.
सरकारने केलेली वचनपूर्तीची आठवण करून देण्यासाठी दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ ला भारतीय कम्युनिस्ट पार्टी व महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्या वतीने शेतकरी,शेतमजूर जबरानजोत झोपडपट्टीधारक संजयगंधी निराधाराचा विशाल आक्रोश धरणे आंदोलन व तीव्र निदर्शने कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करा, शेतकऱ्यांना बीन व्याजी कर्ज द्या, पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करा, जबरानजोतधारक, झोपडपट्टीधाकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे , अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, नुकताच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाली आहे तेव्हा तातडीने पंचनापे करून भरीव मदत द्या.
शेतकरी,शेतमजूर, असंघटित कामगार यांना दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्याचा कायदा करावा, संजय गांधी निराधार योजनेचे थकीत रक्कम त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे,जंगल व्याप्त गावात वाघांचा तात्काळ बंदोबस्त करावा,मुडझा आवळगांव रोड चे काम जलदगतीने सुरू करावे.उन्हाळी हंगामा करिता गोसेखुर्द धरणाचे उजव्या कालव्याचे पाणी द्या.आदी मागण्यासाठी दिनांक २७ लाछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विशाल आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात निमंत्रक किसान कामगार नेते कॉ.विनोद झोडगे पाटील कॉ.डॉ. महेश कोपुलवार, सुधाकर महाडोरे,प्रशांत डांगे अविनाश राऊत,हरिश्चंद्र चोले, लोमेश मेश्राम,आदींनी मार्गदर्शन केले.त्यानंतर सबंधित मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना देण्यात आले. या धरणे आंदोलनात मुडझा आवळगांव या परिसरातील अनेक शेतकरी शेतमजूर झोपडपट्टी धारक संजय गांधी निराधार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन देताना धनराज ठाकरे,सुधीर खेवलें, तुकाराम महाडोरे, वर्षा घुमे, हिरालाल नागपुरे,बाळकृष्न दुमाणे,रामदास कांबळी, तुळशीराम काटलाम ,शरद ठाकरे,विजय उरकुडे, दादाजी तोंडारे रामुजी ठवरे,भाऊराव ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.



