ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसीलदार भांडारकर यांना या ठिकाणी रुजू करू नये

अन्यथा आंदोलन: भारतीय जनसंसदेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        शेतकरी आत्महत्या प्रकरणात निलंबित तहसीलदारांचे न्यायालयाने निलंबन रद्द केले असून त्यांना परत भद्रावती येथे रुजू करू नये. अशा आशयाचे निवेदन भारतीय जनसंसदच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

शेतीच्या फेरफार प्रकरणी तहसीलदारांनी कोणताच निर्णय न घेतल्याने त्रस्त झालेला शेतकरी परमेश्वर मेश्राम याने विष पिऊन आत्महत्या केली.

या प्रकरणात तहसीलदार राजेश भांडारकर तसेच नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना शासनाने निलंबित केले. या निलंबना विरोधात भांडारकर आणि खांडरे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांचे निलंबन रद्द केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर या ठिकाणी तहसीलदार यांचे विरोधात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना परत या ठिकाणी रुजू करू नये. त्यांना रुजू केल्यास आंदोलनाचा मार्ग उभारू असा इशारा या निवेदनात दिला.

भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बदखल, विदर्भ प्रमुख अविनाश आंबेकर, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधीर सातपुते, ज्ञानेश्वर लांबट यांनी या आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांना दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये