डाक विभागातर्फे शंकरराव निवलकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतीय डाक विभागातील प्रामाणिक व कार्यतत्पर अधिकारी शंकरराव निवलकर यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय संचार आणि पूर्वोत्तर विकास मंत्री मा. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते वडोदरा येथे झालेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात देशभरातील निवडक डाक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील पाच अधिकाऱ्यांना या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यामध्ये शंकरराव निवलकर यांचा समावेश असून हा चंद्रपूरसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
निवलकर यांनी डाक सेवेत तंत्रज्ञानाधारित सुधारणा, जनसंपर्क वृद्धी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांचा राष्ट्रीय सन्मानाने गौरव केला.
शंकरराव निवलकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा गावचे रहिवासी असून, त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावर



