ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निकृष्ट दर्जाच्या कामांवर शिवसेनेचा हल्लाबोल!

बाजार वॉर्ड परिसरातील अपूर्ण रस्त्याच्या कामांबाबत संताप : जनतेच्या पैशावर ढिलाई चालणार नाही : सुयोग भोयर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       बाजार वॉर्ड परिसरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या आणि विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला. अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाकडे तातडीने तपासणी व दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज संबंधित कामांच्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी ठेकेदार तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले.

“जनतेच्या पैशावर चालणाऱ्या कामांमध्ये ढिलाई चालणार नाही. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा ठाम इशारा श्री. सुयोग भोयर, माझी कामगार सेना जिल्हा प्रमुख (चंद्रपूर) यांनी दिला.

नागरिकांमध्येही कामांच्या दर्जाबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, अपूर्ण कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 यावेळी नितीन सातपुते, मनोज भडगरे, अशोक निगम, सुनील पडोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये