गावठी मोहा दारु अड्डयावर प्रोरेड
संपूर्ण मुद्देमाल जप्त ; आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
घटना तारिख वेळी व स्थळी मुखबिरचे खबरेवरुन पो.नि. श्री. मनोज गभणे ठाणेदार पो.स्टे. सेलू यांनी स्वता पंच व पो.स्टाफ स. फौ/निरंजन वरभे, पो.हवा. तुषार भुते व मंगेश राऊत व पोलीस अंमलदार तुषार भोंबे यांचे सह मौजा शिवनगाव परिसरातील मोहगाव शिवारात आरोपी शंकर पुरुषोत्तम पिंपळे रा. शिवनगाव याचे गावठी मोहा दारु अड्डयावर प्रोरेड केला असता, दारु भट्टी काढण्याकरीता त्याचे नातेवाईकाचे शेतातील विहीरीतुन मोटारीने पाईपव्दारे पाणी घेवुन तेथे 06 दारु भट्यांव्दारे मोहा दारु गाळीत असल्याचे आढळून आले. मौक्यावरुन प्रत्येकी 200 लीटर चे 18 लोखंडी ड्रम मधील 3600 लीटर कच्चे मोहा सडवा रसायण किंमत 3,60,000/- रु., व दारु भट्टीचे साहीत्य ज्यात 08 लोखंडी ड्रम, 6 जर्मनी घमेले, विहीरीवरील 1 एच. पी. ची सबमसर्सीबल पाण्याची मोटर, 400 फुट रबरी पाईप व ईलेक्ट्रिक केबल व ईतर दारु भट्टी साहीत्य किंमत 44000/-रुपये असा एकुण जुमला किंमत 4,04,000/-रु.चा. माल जप्त करुन आरोपीताविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु आहे.