ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गर्दी मध्ये दारू पिवून दारूच्या नशेत ऑटो चालवीणाऱ्या ऑटो चालकविरुद्ध गुन्हा दाखल

ऑटो जप्त वाहतूक शाखेची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 11/10/25 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशन्वये वाहतूक पोलीस अंमलदार यांना बाजारात गर्दीच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिलेले होते त्यानुसार वाहतूक पोलीस ASI धीरज पांडे, पो हवा अनिल तिवारी हे बजाज चौकात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक ऑटो चालक का अति वेगाने व निष्काळजी पणे ऑटो चालवीतना दिसून आला त्याचा ऑटो थांबवून त्याचा तोंडाचा वास घेतला असता तो दारू पिल्याचा व दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले त्याची मेडिकल तपासनी केली असता तो दारू पिलेला असून दारूच्या अमलाखाली दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाल्याने ऑटो क्रमांक MH 31 DS 3895 चा चालक शरद हरिदास बढे वय 46 रा साठोडा, वर्धा याच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा नोंद करून सदर ऑटो रिक्षा हा वाहतूक पोलिसांनी जप्त केलेला आहे, सदर कार्यवाही सहाय्यक पो उप नि धीरज पांडे व अनिल तिवारी यांनी केली आहे

तरी सर्व वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की कोणीही मद्य दारू पिवून कोणतेही वाहन चालवू नये व अपघात होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी

            पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये