श्री. संत शिरोमणी नगाजी महाराज यांनी सत्य, प्रेम, दया याचा संदेश दिला – प्रा.अशोक सालोटकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- थोर समाजसुधारक, कीर्तनकार आणि जनसेवक म्हणून महाराज ओळखले जातात. त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजामध्ये सदृभावन, भक्ती आणि नैतिक मुल्याच प्रचार केला.
जातीभेद अंधश्रद्धा आणि व्यसन यांच्या विरोधात आवाज उठविला. त्यांच्या विचारामुळे लोकांनी जीवनमार्ग बदलविला.तसेच त्यांनी सत्य, प्रेम, दया याचा संदेश दिला.आज आपण त्यांच्या कार्याचा विचार केला तर आपल्याला जीवनात योग्य दिशा मिळते.
समाजात प्रेम,ऐक्य आणि प्रगती साधण्यासाठी त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत असे श्री. संत शिरोमणी नगाजी महाराज पुण्यतिथी प्रसंगी विदर्भ पूर्व विभागीय अध्यक्ष प्रा. अशोक सालोटकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पूर्व विदर्भ संघटक घनश्याम सुर्यवंशी, ब्रम्हपुरी तालुका महिला अध्यक्ष रश्मी पगाडे, तालुका अध्यक्ष उदय पगाडे, विदर्भ पूर्व विभागीय सदस्य विनायक शेंडे, आनंद दाणी, केवळराम सुर्यवंशी, अंजली सुर्यवंशी, वर्षा सालोटकर, प्रकाश पगाडे विदर्भ पूर्व पदाधिकारी, संजय मेश्राम, आनंदराव सुर्यवंशी उपस्थित होते.