ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे जंगी कुस्ती स्पर्धेत धुळे व वाशीमचे पैलवान ठरले विजेते 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सव निमित्त समस्त वैदू समाजाच्या वतीने आज दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी जंगी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली

जवळपास 70 वर्षाची परंपरा लाभलेला हा जंगी कुस्ती स्पर्धा कार्यक्रम आजही तेवढ्याच उत्साहात शहरातील वैदू समाज बांधवांच्या वतीने आयोजित केला

   या स्पर्धेचे उद्घाटन आमदार श्री मनोज भाऊ कांयदे व मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

  अध्यक्ष स्थानी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर होते. यावेळी प्रथम बक्षीस 51,000 हजार रुपये द्वितीय बक्षीस 11000 रुपये होते.

 प्रथम बक्षीस साठी राजपूत, धुळे आणि वाशिमचा पैलवान यांच्याविरोधात सामना रंगला

 अतिथटीच्या सामन्यात दीड तास सामना सुरू असताना दोन्ही पैलवान समान असल्यामुळे वेळअभावी दोघांना समान बक्षीस देण्यात आले

 याप्रसंगी ठाणेदार ब्रह्मगिरी उपनिरीक्षक नलवडे, शिक्षक पतसंस्था अध्यक्ष मारुती शिवरकर, गट शिक्षणाधिकारी मुसदवाले,राजेश भुतडा,नंदन भाऊ खेडेकर,इस्माईल बागवान, सलीम भाई,पठाण रफिक मेंबर,कुमठे सर, डॉ उमेश मुंडेसर,डॉ सुनील भाऊ कायंदे, राजूभाऊ इंगळे, गोविंद भाऊ झोरे, दादराव खार्डे,निशिकांत भावसार, आतिश कासारे, रमेश कांयदे, राजेश इंगळे, डोईफोडे सर,हरिभाऊ वाघ, जयदीप नागरे,सौरभ दराडे, प्रदीप वाघ, सदाशिव मुंडे, दिलीप भाई खरात पैलवान कैलास शेळके, धर्मराज हनुमंते, खैरे साहेब, उपस्थित होते अजय भाऊ शिवरकर मित्र मंडळ व वैदु समाजाचे वतीने सर्वांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये