ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे दोन दिवसीय नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   श्रीसंत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती भद्रावतीच्या वतीने ८ व ९ऑक्टोबरला दोन दिवसीय श्रीसंत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन स्थानिक नगाजीनगरातील संत नगाजी महाराज मंदिरात करण्यात आले आहे. या पुण्यतिथी महोत्सवात विविध आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधन, ‘श्रीं’ची घटस्थापना, पूजा व आरती असे कार्यक्रम होतील. यावेळी महिलांकरिता व मुलींकरिता महिला संमेलन आणि आनंद मेळावा, सामुदायिक प्रार्थना, जाहीर कीर्तनाचा व गोपाळकाल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विचारमंथन, पोथीचे पारायण होईल. दि ९ आक्टोबरल जान्हवी घुमे सप्तखंजेरी वादक यांचा समाज प्रबोधनावर जाहिर किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. निवृत्ती पिस्तुलकर , प्रमुख अतिथी हंसराज अहिर अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी आयोग, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, शिवसेना संघटक मुकेश जिवतोडे, समीर वाटेकर ॲड.सुनील नामोजवार आदी उपस्थित राहणार आहे .ओम शिवशक्ती महिला भजन मंडळ भद्रावती यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर पालखी सोहळा, शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये