ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकात्म मानव दर्शन विषयावर व्याख्यान संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सिपेट सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ‘एकात्म मानव दर्शन’ या विषयावर सन्मित्र सैनिक शाळेचे शिक्षक तथा सिनेट सदस्य श्री गुरुदास कामडी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य वैभव बोनगीरवार होते.

    एकात्म मानव दर्शन हा असा एक विचार आहे की, जो व्यक्ती आणि समाज यांच्यात समन्वय साधण्यावर भर देतो, या दर्शनानुसार मानवी जीवन हे एका व्यक्तीपूरते मर्यादित नसून, ते कुटुंब समाज ते विश्वापर्यंत पसरलेले असते. हे दर्शन भारतीय संस्कृती आणि जीवन मूल्यांवर आधारित आहे,असे प्रतिपादन श्री. गुरूदास कामडी यांनी केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो समिती सदस्य श्री. बंडोपंत बोढेकर यांनी केले. यावेळी विचार पिठावर कार्यक्रम अधिकारी सौ.जयश्री निमसरकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार, गटनिदेशक श्री. हितेश नंदेश्वर, श्री. जितेंद्र टोंगे, श्री.रामभाऊ लांडगे आदी उपस्थित होते. अतिथी परिचय निदेशक किशोर इरदंडे यांनी केले.सूत्रसंचालन कु. खापर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन निदेशिका रंजना ढाकणे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये