विदर्भ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी आणि स्वच्छतादुत परेश तावाडे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली येथील विदर्भ नागरिक सहकारी पतसंस्था सावलीच्या वतीने पत्रकार भवन येथे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात माता लक्ष्मी यांना दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली, ठेवीदार ही चिंतक दिवंगत झाले त्या सर्वांना मौन पाडून अभिवादन करण्यात आले.
सभासद पाल्य गुणवंत विद्यार्थी रसिक देवराव मोहुर्ले,अद्वेद मोहन गाडेवार,जानवी चरणदास लेनगुरे, शिवम दिवाकर गुरनुले यांना शिल्ड, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर व स्वच्छतेला मिशन म्हणून काम करणारे व्यक्तिमत्व स्वच्छता दूत प्रशांत तावाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर पतसंस्थेचे उपाध्यक्ष शंकर दिकोंडवार ,संचालक अजय पोटवार,विलास आकुलवार, गुरुदास कोसरे,अभय बोरुले,अमोल कोसरे, कैलास कापगते, रत्नपाल उईके, सुधाकर गाडेवार चंदाताई लेनगुरे,मंगला गुंडावार यांची उपस्थिती होती.
संस्थेच्या हितासाठी सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य करावे नियमित कर्ज भरणे असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.प्रास्ताविक रत्नपाल उईके,संचालन व्यवस्थापक अतुल लेनगुरे तर आभार लेखापाल रवी सिद्धीकिवार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कर्मचारी वर्ग दैनिक अभिकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.