गुरदास कामडी यांना उत्कृष्ट अधिसभा(सिनेट)सदस्य पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली वर्धापन दिना निमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२५ च्या, जा.क्रं. गो.वि/आस्था./३१४६/२०२५ या अधिसूचने द्वारा घोषित करण्यात आहे.
सत्र २०२५ करिता उत्कृष्ट अधिसभा( सिनेट) सदस्य पुरस्कार अधिसभा (सिनेट) सदस्य गुरुदास गंगुबाई मंगरुजी कामडी यांना घोषित करण्यात आला आहे .हा पुरस्कार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चा वर्धापन दिन ६ आक्टोंबर २०२५ रोजी विद्यापीठ सभागृह संपन्न होत आहे. त्या दिवशी हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे.
गुरदास कामडी २०१० ते २०१५ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणून पदवीधर मतदार संघातून निर्वाचित झालेले होते.या काळात विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रश्न अधिसभेत मांडलेले आहेत.२०१४ ते २०१७ या कालावधीत गोंडवाना विद्यापीठाच्या शारिरीक शिक्षण व क्रीडा बोर्डाचे सदस्य म्हणून काम केलेले आहे.सप्टेंबर २०२२ ला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट मध्ये पदवीधर मतदार संघातून निर्वाचित झालेले आहेत. विद्यापीठाच्या सिनेटमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सभागृहात उपस्थितीत केलेले आहेत. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, क्रीडा स्पर्धा आयोजनात सुधारणा यासारख्या प्रश्न सभागृहात लावून धरलेले आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, खरेदी समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठा ७ विविध अध्यासनाचे सदस्य आहेत.
गुरुदास कामडी यांना यापूर्वी भारत शिक्षण रत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक, महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गुरुदास कामडी यांना उत्कृष्ट अधिसभा( सिनेट) सदस्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतजी बोकारे,प्र-कुलगुरु डॉ. श्रीरामजी कावळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत मोहीते,स्वपनिलजी दोंतुलवार, डॉ. लेमराज लडके,डॉ. संजय गोरे,डॉ. विवेक गोर्लावार, प्रशांत दोंतुलवार, डॉ. नंदाजी सातपुते,डॉ. रंजना लाड सिनेट सदस्य प्रा.योगेश येणारकर,प्रा.धर्मेंद्र मुनघाटे,संजय रामगिरवार,स्वरुप तारगे,सतिष पडोळे,डॉ. सागर वझे, यश बांगडे,किरण गजपूरे,सतिष चिचघरे श्रीकांत कुमरेआदिनी अभिनंदन केलेले आहे.