ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या

महाविकास आघाडीचे निदर्शन आंदोलन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

          अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने सरकारने तात्काळ ओला दुष्काळ शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने देऊळगाव राजा येथे (30 सप्टेंबर) स्थानिक बस स्थानक चौकात भव्य निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        देऊळगाव राजा तालुक्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी सदृश्य पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांची हानी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये शेतजमीनी खरडून गेल्या आहे.

शेतात पाणी शिरल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. कपासी, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपयांची मदत मिळावी. या प्रमुख मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने बस स्थानक चौकात निदर्शने देऊन आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनात गंगाधर जाधव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, काँग्रेसचे रमेश कायंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे, काँग्रेसचे अनिल सावजी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे, शहर अध्यक्ष आतिश कासारे,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष दादाराव खार्डे, गजानन पवार, रंगनाथ कोल्हे, कवीश जिंतूरकर, उद्धव मस्के,गणेश सवडे, आतिश कासारे, , गणेश बुरकूल, , परमेश्वर शिंदे, महेश देशमुख, विजय खांडेभराड, संतोष बुरकुल, शिवाजी कोल्हे, संदीप कटारे,सुधाकर मस्के, विलास खरात,हनीफ शाह, प्रकाश राजे, इरफान पठाण, नसेर, बाबासाहेब कोल्हे,मुबारक शाह, अयुब भाई, प्रा अशोक डोईफोडे, नितेश देशमुख,पवन झोरे, गजानन चेके,राजू नागरे, अजय शिवरकर,नारायण कोल्हे, नवनाथ गोंमधरे, शे. करीम,रावसाहेब डोके, गजानन घुगे, शौकत हुसेन, इस्माईल बागवान, रामू खांडेभराड, रफिक पठाण, गणेश दंदाले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये