ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विसलोन ग्रामपंचायत येथील निकृष्ट दर्जाच्या काँक्रिट रस्त्याबाबत शिवसेनेचे निवेदन

अर्धवट काम पूर्ण करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करू : सुरज शाहा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  भद्रावती तालुक्यातील विसलोन ग्रामपंचायत हद्दीत झालेले काँक्रिट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून, अवघ्या सहा महिन्यांतच रस्ता तुटू लागला आहे. गिट्टी, सिमेंट उखडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे, तसेच अंदाजपत्रकात नमूद असूनही नाली बांधकामाचे काम आजतागायत झालेले नाही. मात्र ठेकेदारामार्फत “काम पूर्ण झाल्याचा” फलक लावण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

या गंभीर प्रश्नावर शिवसेनेचे शिवसैनिक सुरज शाहा यांच्या नेतृत्वात व समस्त विसलोन गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने भद्रावती येथील उपकार्यकारी अभियंता (PWD) तसेच चंद्रपूर येथील जिल्हा कार्यकारी अभियंता (PWD) यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, सदर निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अंदाजपत्रकात नमूद असूनही न झालेले नाली बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे. ७ दिवसांच्या आत जर चौकशी व कारवाई झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने समस्त गाववासीयांना घेऊन PWD कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

       निवेदन देते वेळी शिवसैनिक सुरज शाहा, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक कदीर पठाण, राज चव्हाण, वसंता उंमरे, अनिल दर्वे, प्रमोद खापणे, धीरज उमरे, महादेव बोबडे, नरेंद्र वानखेडे, पवन वैद्य, सरिता तुराणकर, कल्पना कुथे, सुनिता आगलावे, रेखा खापणे, शैलाबाई बोबडे, व समस्त गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये