ढाणकी येथील मृत्युस कारणीभुत ठरलेल्या नराधम शिक्षकास फाशीची शिक्षा द्या
सावली पद्मशाली समाजाचे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांनी ला शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक नराधमाने अनैतिक संबंध प्रस्तापित करून पिढीतेस मानसिक दडपनणात आणले.- या दरम्यान युवती गर्भवती राहल्यानंतर आरोपी शिक्षक सज्ञान असतानाही बेजवाबदारपणे पिडीतेस त्या शिक्षकाने गर्भपाताच्या गोळ्या देऊन त्या युवती चा दिनांक २२/ ०९/ २०२५ रोजी मुत्यु झाला. त्यामुळे आरोपी शिक्षकावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.आरोपी शिक्षक संदेश गुंडेकर वय २७ वर्.रा.सरसम बु. ता. हिमायतनगर, ह.मु. ढाणकी ( यवतमाळ) याला या प्रकरणात पोलिसानी तात्काळ कार्यवाही करून आरोपी शिक्षकास कठोर कार्यवाही करावी.
या गंभीर गुन्ह्यासाठी आरोपी संदेश गुडेकर आणि त्याचे दोन्ही भाऊ साईशाज गुंडेकर आणि आशिष गुंडेकर यांना सुद्धा अटक करण्यात यावी आणि कठोर शिक्षा करावी या प्रकरणी विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करूण जलद गतिने तपास पुर्ण करून हा खडला फास्ट्रक कोर्टात चालवून पिडीतेला व तिच्या कुंटूबियांना न्याय मिळवून द्यावा. या मागणी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावली तहसील कार्यालयात जावून नायब तहसीलदार चांदेकर साहेब व पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष रवींद्र आडेपवार, पद्मशाली फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज बोम्मावार, प्राचार्य डॉक्टर ए.चंद्रमोली, नगरसेवक सतीश बोम्मावार, सचिव अजय बोदुनवार, संजय मेरुगवार, सुदर्शन चामलवार,मंगेश तुम्मे, सतीश परसावार, चेतन बोम्मावार, अमोल मुळेवार,तुकाराम कोंडेकर,उमेश अलसावार, सुरज अडेटवार, विनोद बंडावार, रोशन मेरूगवार,विनोद अलसावार,रमेश म्यानावार, अरुण येनगंदलवार यावेळी उपस्थित होते.