ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायवनजवळ दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथून जवळच असलेल्या नायरा पेट्रोल पंप ते सायवन फाटा दरम्यान मंगळवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान झालेल्या अपघातात निखील झाडे (२५) रा. दहेली, बल्लारपूर याचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतक निखील हा आपल्या आई इंदिरा झाडे यांना घेऊन दुचाकी क्र. एमएच ३४ सीएन १४७० ने माजरीकडे काकांच्या घरी जात होता. दरम्यान कुंदन ट्रॅव्हल्सची बस क्र. एमएच ३७ टी ९००३ व दुचाकी यांच्यात अपघात घडला. दुचाकीचा हँडल बसला लागल्याने हा अपघात घडल्याचे समजते.

या अपघातात निखीलचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आई इंदिरा झाडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह ग्रामीण रूग्णालय भद्रावती येथे नेण्यात आला असून भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये