शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत शासकीय तंत्रनिकेतन, ब्रह्मपुरी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून संस्थेची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
तृतीय वर्ष परीक्षेत मंथनी राजू कोल्हे (संगणक) ९२.८२%, कौशिक दत्तू गोंगले (स्थापत्य) ९१.८९%, साहिल दशरथ पुठ्ठावार (विद्युत) – ९१.०६%, अनिरुद्ध गजानन शहारे (यंत्र) ८९.७७% आणि महेश ठवरी (मेकॅट्रॉनिक्स) ८६.४७% गुण प्राप्त करून विशेष यश संपादन केले. द्वितीय वर्ष परीक्षेत श्रावणी महेश चोले (स्थापत्य) ९१.२९%, नैतिक आशिष लोहकरे (संगणक) ८९.१८%, गायत्री प्रवीण चतारे (विद्युत) – ८८.८२%, समित रवींद्र पडोळे (यंत्र) ८८.६७%, राहुल वलके आणि श्रेयस कावडकर (मेकॅट्रॉनिक्स) ७७.७८% गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. प्रथम वर्ष परीक्षेत सिद्धी पुरुषोत्तम जिभकाटे (संगणक) ८१.८८ %, क्रिश भोलानाथ दोनाडकर (स्थापत्य) ७९.१८%, निहाल प्रकाश कामडी (विद्युत) – ७८.१२%, नंदकिशोर गरघाटे (यंत्र) ७७.६५%, सुधांशू धीरज पाटील (मेकॅट्रॉनिक्स) ७१.४१ % गुण प्राप्त करून यश संपादन केले.
या यशाबद्दल डॉ. राजन वानखडे, प्र. प्राचार्य, डॉ. आशिष बहेंडवार, उपप्राचार्य, विभागप्रमुख प्रा. जयंत बोरकर, प्रा. माधुरी नागदेवे, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा. मीनाक्षी मानलवार, प्रा. नितीन डोरलीकर आणि सर्व अधिव्याख्याता, कर्मचारी व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



