ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुका भाजपा उपाध्यक्षपदी राकेश गोलेपल्लीवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील जिबगांव येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले तसेच जनतेच्या हक्कासाठी, शासकीय योजना सामान्य जनतेला मिळावी यासाठी सतत प्रयत्न करणारे मा.राकेशभाऊ मधुकर गोल्लेपल्लीवार यांची भारतीय जनता पार्टीच्या सावली उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

   भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रभक्तीचा विचार तसेच शेवटच्या व्यक्तीचा कल्याणाचा विचार घेवून देशसेवेसाठी कार्यरत राजकीय पक्ष आहे. सावली ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची मोठी जबाबदारी या माध्यमातुन आपणावर आली आहे. आपण भाजपाचे सच्चे सैनिक आहात. ही जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडाल याचा मला विश्वास आहे. विश्वगौरव मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने तसेच राज्यातील मा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने घेतलेले लोकाभिमुख निर्णय जनतेपर्यंत पोहचवत भाजप आणि जनता यांच्यातील नाते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपण अधिक दृढ कराल याचा मला विश्वास आहे. आपल्या या नव्या जबाबदारीच्या यशस्वीतेकरिता भारतीय जनता पार्टी तालुका सावली पदाधिकारी यांचे कडुन मनःपूर्वक शुभेच्छा ! दिले आहे

सदर पद हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.किशोर भाऊराव वाकुडकर यांनी सामाजिक कार्य पाहून पद देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये