आठव्या दिवशी उपोषणाची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना – सांगोडा येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांचे सांगोडा ग्रामपंचायत विरोधात बेकायदेशीरित्या कंपनीला देण्यात आलेल्या गायरान जमिनी सह विविध मागण्यासाठी आठ दिवसापासून तर याच सोबत रविवारपासून राजीव बालाजी कोल्हे यांनी ही याच मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते . दरम्यान मंगळवारी दुपारी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना शिष्टमंडळानी दिलेल्या भेटीनंतर सकारात्मक चर्चा होऊन न्याय मागण्यावर तोडगा निघून लेखी आश्वासनानंतर उपोषण मंगळवारी सायंकाळी सव्वा सात च्या सुमारास मागे घेण्यात आले.
मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात महसूल व वनविभागाच्या शासन परिपत्रक नुसार गायरान जमिनी नाहरकत प्रमाणपत्र देण्याप्रकरणात ग्रामसभेचा ठराव आवश्यक असण्याबाबत नमूद केले. यासोबत अन्य मागण्यावर तोडगा काढण्यासाठी नियमाच्या अधीन राहून कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
उपोषणाच्या सांगतेवेळी तहसीलदार पल्लवी आखरे, गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, पोलीस निरीक्षक सुनील गाडे, जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे, तालुका काँग्रेस अध्यक्ष उत्तम पेचे, माजी सभापती श्याम रणदिवे, सुरेश मालेकर, माजी सरपंच वामन मुसळे,नितीन बावणे,आशिष देरकर, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर व मोठ्या संख्येने सांगोडा व कारवाई गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
आपली जमीन आपल्या ताब्यात असल्यामुळे गावकऱ्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी गावातील महिलांची नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती