ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दादाचा दांडिया उत्सव-२०२५ उत्साहात पार

चांदा ब्लास्ट

घूग्गुस येथील प्रयास सभागृहात रविवारी प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे दादाचा दांडिया उत्सव-२०२५ अंतर्गत दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटात संपन्न झाला.

प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे सलग सातव्या वर्षी हा भव्य दांडिया उत्सव आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा घुग्घुसचे भूमिपुत्र देवराव भोंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रमुख अतिथी भाजपाचे चिन्नाजी नलभोगा, युवा नेते अमोल थेरे, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, जिल्हा सचिव विनोद चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे, युवा नेते गणेश कुटेमाटे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोसकूला, प्रेमलाल पारधी, हसन शेख, आजम खान, रत्नेश सिंग, प्रमोद भोस्कर, सिनू इसारप, सुनील बाम, प्रदीप जोगी, सन्नी खारकर, बबलू सातपुते, अनिल नित, दिनेश बांगडे, तुलसीदास ढवस, शंकर सिद्दम, धनराज पारखी, सिनू रामटेके, नितीन काळे, इर्शाद कुरेशी, सतीश बोन्डे, श्रीकांत सावे, मिलिंद पानघाटे, मोमीन शेख, दिलीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आमदार देवराव भोंगळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

स्पर्धेत एकूण ४१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्यांना रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, आकर्षक ट्रॉफी अशी बक्षिसे तसेच लकी ड्रॉमधून पैठणी साडी, मिक्सर, मोबाईल, गिफ्ट सेट, हॉटस्पॉट व टिफिन अशी पारितोषिके देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजिका अर्चना भोंगळे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, माजी सभापती नितु चौधरी, वैशाली ढवस, कुसुम सातपुते, सारिका भोंगळे, सिमा पारखी, शिल्पा थेरे, निशा उरकुडे, पुष्पा रामटेके, विना घोरपडे, अमीना बेगम, नाजमा कुरेशी, विना बांगडे, रुंदा कोंगरे, वंदना मुळेवार आदींनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये