ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा..!

 सूरज गोंडे यांची मागणी ; गडचांदूर पोलिस स्टेशनमध्ये दिली तक्रार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

लोकसभा विरोधी पक्ष नेते मा. राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी लाईव्ह टेलिव्हिजनवर दिलेली धमकी ही अत्यंत गंभीर चिंताजनक बाब असून या प्रकरणी संबंधित प्रवक्त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी गडचांदूर युवक शहर काँग्रेस तर्फे करण्यात आली.

     यावेळी गडचांदूर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज गोंडे यांच्या नेतृत्वाखाली, इंदर कश्यप (महासचिव, गडचांदूर शहर युवक काँग्रेस) व सदानंद गिरी यांच्या उपस्थितीत गडचांदूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार सादर करण्यात आली.

      भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते थेट देशाच्या लोकशाही मूल्यांवर गदा आणणारी भाषा वापरत असल्याने युवक काँग्रेसने या प्रकरणी कठोर कार्यवाही व्हावी, व राहुलजी गांधी यांच्या जीवाला धोका पाहता त्यांना एस पी जी सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये