सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा,व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती विरंगुळा भवन येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर.प्रमुख पाहुणे म्हणून गोविंदराव अहिरे,विजयभाऊ उपाध्ये, प्रा विजय रायमल , पत्रकार.दीपक नागरे ,शातिलालजी निरफळे, उपस्थित होते, प्रा विजय रायमल यांचा वाढदिवस निमित्ताने सत्कार करण्यात आला, सत्काराला उत्तर देताना संघटनेला सतत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.संचालन रमेश नरोडे यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले.
कार्यक्रमाला मधुकरराव धुळे,प्रकाश अहिरे, प्रा विनायक कुळकर्णी, अरुण सपाटे, दिनकर जाधव,रमेश राठोड, श्रीराम राठोड, रमेश गवई, रामदास कुलथे, मार्तंड आप्पा घिके, भगवान भानुसे, गजानन ढवळे, प्रा सुनील मुडसिंगे, राजू शिंगणे, गजानन लुंगे, तथा इतर सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



