अज्ञात चोरट्याचा शेतीमालावर डल्ला
शेतकऱ्याचे पावणेदोन लाखाचे सोयाबीन केले लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव येथे घरासमोर ठेवलेले सोयाबीनचे एक लाख 80 हजार रुपयांचे कट्टे लंपास केल्याची घटना दिनांक 11 जानेवारी रोजी भल्या पहाटे घडली याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या शेतीमालाकडे वळाला असून तालुक्यातील भिवगाव येथील शेतकरी ओम मधुकर चव्हाण यांनी त्यांच्या शेतातील उत्पादित झालेले सोयाबीन कट्ट्यामध्ये भरून आपल्या घरासमोरील ओट्यावर ठेवले होते थंडीचे प्रमाण असल्याने फिर्यादी आणि त्यांचे मित्र घटनेच्या रात्रीला घराच्या बाहेर शेकोटी करून बसले होते त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या घरी निघून गेले तयारी यांनी सकाळी उठून बघितले असता घरासमोरील ओट्यावरील सोयाबीनचे एकूण 72 कट्टे होते त्यापैकी 70 कट्टे किंमत एक लाख 80 हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. शेतकऱ्याच्या पशुधनासह शेतीमालावरही आता चोरटे डल्ला मारत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतीमध्ये अतोनात कष्ट करून पिकवलेला मालावर चोरटे डल्ला मारत आहेत.
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत



